ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील निवासस्थानी एसीबीने धाड टाकली आहे. राजन साळवी यांच्याकडे त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी एसीबीने त्यांच्या घरी धाड टाकली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
राजन साळवी यांचे घर, हॉटेल आणि त्यांच्या भावाच्या घरावर ही धाड टाकण्यात आली आहे. बेनामी संपत्ती प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही आमदार राजन साळवी अलिबाग येथील एसीबी कार्यालयात आतापर्यंत तब्बल सहा वेळा चौकशी झाली होती. त्यानंतर आता त्यांच्या घरी एसीबीने धाड टाकली आहे. गुरुवारी सकाळीच एसीबीचे अधिकारी राजन साळवींच्या घरी दाखल झाले असून त्यांच्या चार ठिकाणांची झाडाझडती सुरु आहे.