जळगाव,(प्रतिनिधी)- पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या मतदारसंघातील म्हसावद या गावात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव ‘राष्ट्रीय सेवा योजना’ शिबीर अंतर्गत पालकमंत्री मा.ना. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा तर्फे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबीरात ४०० च्या वर रुग्णांची वैद्यकीय तपासणी व मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. म्हसावद येथील आरोग्य शिबिरासाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने औषधी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जितेंद्र गवळी यांच्या सहकार्याने उपलब्ध करवून देण्यात आले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी धीरज राठोड, अनिल पवार, सतीश सोनवणे, दिपक घ्यार, प्रदीप पारधी व वैद्यकीय मदत कक्षाचे जळगाव-भुसावळ संपर्क प्रमुख राजेंद्र सपकाळे यांनी आरोग्यशिबीर यशस्वीतेसाठी सुनियोजन करून शिबिर यशस्वी केले.