एखादा विचार मांडला की, आई बहिणीच्या शिव्या मिळतात, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. बुधवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. काही दिवसांपुर्वीच प्रभु श्रीरामांविषयी वादगग्रस्त वक्तव्य केल्याने ते चर्चेत आले होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “राम क्षत्रिय होता की, नव्हता याचे स्पष्ट उत्तर द्या. विपरित परिस्थितीत शांत बसण्याशिवाय पर्याय नसतो. लोकांना विचार मांडणंच आवडत नाही. वैचारिक लढाई लढायचीच नसते. एखादा विचार मांडला की, आई, बहिणी सगळं रस्त्यावर येतं. न बोलण्याचे परिणाम देशाला भोगावे लागतील,” असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “समाज हा प्रातिनिधिक स्वरुपात दिसायला हवा हा बाबासाहेबांचा मुळ हेतू होता. बाबासाहेबांनी आरक्षण म्हणजे आर्थिक उन्नतीचं साधन ठेवलेलं नव्हतं. ज्यांना समाजाने मान्यताच दिली नाही त्यांना मुख्य धारेत आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली होती. शिक्षण हे सर्वदूर जावं हा फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार होता. पण काही दिवसांनी हा महाराष्ट्र अशिक्षित महाराष्ट्र होईल. कारण सगळ्या शाळा खाजगी होत आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील मुले शिक्षणासाठी कुठे जाणार? असेही ते म्हणाले आहेत.