चाळीसगाव,(प्रतिनिधी): घराबाहेर खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीला चॉकलेट देऊन तिला शेजारच्या घरात नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अफरखान राऊत खान (२२, रा. मदिना मशिदीजवळ, चाळीसगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.
दिनांक १३ रोजी दुपारी आरोपीने तिला चॉकलेट खाण्यास दिले. नंतर तिला १०० रुपये देऊन शेजारच्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी चाळीसगाव शहर पोलिसात सोमवारी या घटनेची फिर्याद दिली. त्यावरून त्याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.