पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांनी काल ट्विटरच्या माध्यमातून मालदीव – भारत विषयावर टिप्पणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. यात त्यांनी मोदींचा घोंचू म्हणून शब्दोल्लेख केला होता. याच पार्श्वभुमीवर पुन्हा एक ट्विट केले आहे.
मोदी आणि त्यांच्या पक्षाने वेळोवेळी काही विरोधी नेत्यांची अपमानास्पद नावे घेऊन खिल्ली उडवली आहे. काल मी मोदींना घोंचू म्हटले. आम्ही प्रस्तावित करतो की तुम्ही हा शब्द घ्या आणि एकत्रितपणे त्याला घोंचू म्हणा. असा सल्ला त्यांनी या माध्यमातून दिला आहे
महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी वारंवार पत्र पाठवून ही तुम्ही अजूनही आमचा पक्ष (वंचित बहुजन आघाडी) चा समावेश करून घेऊ शकला नाही, तरी आम्ही तुम्हाला मदत करू अशी इच्छा ही त्यांनी यातून व्यक्त केली आहे.
Dear INDIA alliance members,
Though you are still to induct our party — VBA in both INDIA and MVA despite our repeated letters, we would still like to help you.
Modi and his party have, time and again, mocked and ridiculed certain opposition leaders with derogatory names.… pic.twitter.com/MFY7SIEnzi
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 14, 2024