जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील चोपडा येथील अवघ्या दोन महिन्याच्या जान्हवीला जीवघेणा कॅन्सरची गाठ असल्याचे निदानात निष्पन्न होताचा वडील अशोक खंबायत व आईला यांना धक्काचं बसला, शस्रक्रिया करण्यासाठी लागणारे पैसे कसे उभे करायचे या चिंतेत असलेल्या आई वडिलांच्या मदतीला जळगाव येथील शिवसेनेची वैद्यकीय आघाडी धावून येतं पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधीतून थेट १ लाख मिळवून दिले आणि चिमुकल्या जानव्ही वर जळगावातचं खाजगी रुग्णालयात यशस्वीपणे शस्रक्रिया करण्यात आली आहे. या चिमुकलीची प्रकृती पण चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे.जळगाव येथील शिवसेना वैद्यकीय कक्षाने गेल्या वर्षभरात जळगाव जिल्ह्यातील गरजू रुग्णांना ८ कोटी रुपयांची मदत मिळवून दिली असून मुख्यमंत्री सहायता निधी गरजू रुग्णांना मिळवून देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील ८०० समन्वयक काम करत असल्याची माहिती वैद्यकीय कक्षाने दिली.
सविस्तर असे की चोपडा तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी असलेले अशोक खंबयात यांची दोन महिन्याची चिमुकली जानव्हीच्या पोटाच्या दुःखण्या मुळे त्रस्त होती तिला जळगाव येथे खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता वैद्यकीय तपासणी नंतर जानव्हीच्या वडिलांना मुंबई येथे मोठ्या रुग्णालय मध्ये इतर तपासण्या करण्याचे सांगण्यात आले त्यानुसार लागलीच मुलीला तिच्या वडिलांनी मुंबई येथील वाडिया लहान मुलांचे रुग्णालयात जातं तपासण्या केल्या असता अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुकल्या जान्हवी ला जीवघेणा अजार कॅन्सर ची गाठ असल्याचे निष्पन्न झाले. कॅन्सर असल्याचे ऐकल्यावर जानव्ही चे आई वडील व नातेवाईक सुन्न होऊन आता पुढे कसं होणार या चिंतेत होते.
दरम्यान कॅन्सर गाठीची शस्त्रक्रिया करावी लागेल पण या दरम्यान चिमुकल्या रुग्णांची शाश्वती नाहि असे डॉक्टरांनी सांगितले.अश्या वाईट परस्थिती मध्ये पुन्हा त्यांनी जळगाव शहर गाठले आणि जानव्हीचे वडील अशोक खांबायत यांनी जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच रुग्णालयात विचार पुस केली पण त्यांनीही ही या लहानग्या मुलीची गुंतागुंती ची शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला.
दरम्यान शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव ऑफिस ला भेटून बघा असे जानव्हीच्या वडिलांना सांगण्यात आले त्यावेळी जानव्हीच्या वडिलांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला भेट दिली व सर्व आप बिती सांगितली , रडू लागले अश्या परस्थितीत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्क प्रमूख जितेंद्र गवळी व डाँ मोईज देशपांडे यांनी चांडक कॅन्सर हॉस्पिटल येथे डॉक्टरांशी बोलणं करून शस्त्रक्रिया करण्यास विनंती केली… डॉक्टरनी तयारी दर्शवली व अवघ्या 2 महिने वय असलेल्या चिमुकली वर अवघड व गुंतागुंतीची जीवघेनी शस्त्रक्रिया अथक प्रयत्नांनी यशस्वी सुख रूप पार पडली आज रोजी बाळाची तब्येत चांगली असून त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून तत्काळ रुपये 1,00,000 चा निधी मंजूर करून देण्यात आला. आज उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जितेंद्र गवळी वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख डाँ मोईज देशपांडे श्री राजेंद्र सपकाळे दीपक पाटील विशाल निकम चेतन परदेशी व संपूर्ण टीमने मुलीची चांडक हॉस्पिटल येथे जाऊन तब्येतीची विचारपूस केली आता चिमुकलीची तब्येत चांगली असल्याचे मुलीचे वडील यांनी सांगितले तसेच पूर्ण परिवाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व संपूर्ण टीम चे आभार मानले.