मुंबई : संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल असंसदिय शब्दांचा वापर केल्याने त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याच शिवसेना आमदार व मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटल आहे. १०जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यावर प्रतिक्रीया देताना ११जानेवारीला पत्रकारांशी ते बोलत होते.
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी १० जानेवारीला दिला शिवसेना पक्षाची १९९९ च्या घटनेला ग्राह्य धरुन अध्यक्षांनी शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि भरत गोगावले यांची प्रतोद म्हणुन नियुक्ती योग्यच आहे. त्यामुळे त्यांनी काढलेली व्हीपच योग्य आहे असा निकाल दिला. त्याचबरोबर शिवसेना आणि उबाठा या दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रतेच्या य़ाचीका फेटाळुन लावल्या.
त्यावर प्रतिक्रीया देताना आदित्य ठाकरे व संजय राऊत फारच आक्रमक झालेले पहायला मिळाले. दोघांनीही विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पातळी सोडत टीका केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात कायदेशिर कारवाई करणार अस शंभूराजे देसाई यांनी म्हटल आहे.
“जोपर्य़ंत न्यायपिठ तूमच्या बाजूने निकाल देत आहे तोपर्य़ंत ठिक आणि कायद्याच्या चौकटीत तुमच्या विरोधात निकाल दिला तर चूक अस मानून अध्यक्षांवरच असंसदिय शब्दात टीका करायची हे योग्य नाही त्यामुळे त्यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार” अस मत शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले आहे.