पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारतीय आणि पंतप्रधानांविषयी मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आता मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या अडचणीत वाढ झाली. चीन समर्थक मानल्या जाणाऱ्या मुइज्जू यांची सत्ता, ते चीन दौऱ्यावर असतानाच जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मालदीवमधील संसदीय अल्पसंख्याक नेते अली अझीम यांनी सोमवारी राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाची आणण्याची तयारी सुरु केली आहे. अली अझीम यांनी ट्विट करत ही माहिती दिली. ते म्हणाले की, “देशाच्या परराष्ट्र धोरणात स्थिरता राखण्यासाठी आणि कोणत्याही शेजारी देशाला एकाकी पडण्यापासून रोखण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.
मुइज्जू यांना पदावरुन हटवण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांची मदत मागितली आहे. ते म्हणाले की, ” राष्ट्रपती मुइज्जू यांना सत्तेवरून हटवण्यासाठी तुम्ही आवश्यक ती पावले उचलण्यास तयार आहात का?” अली अझीम यांनी अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यास मुइज्जू यांना पदावरुन पायउतार व्हावे लागेल. सध्या मुइज्जू यांचा पक्ष इतर सहकारी पक्षांच्या मदतीने मालदीवच्या सत्तेवर काबीज आहे.