गुढे – येथील कै. सौ. बहिणाबाई धनाजी महाजन अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा गुढे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक मुख्याध्यापक श्री. विजय महाजन सर व प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक मुख्याध्यापक श्री. शिवाजी महाजन सर, पर्यवेक्षक श्री नितीन साळवे सर हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व जयपालसिंग मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व आदिवासी जननायक जयपाल सिंग मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक:- 3जानेवारी रोजी इयत्ता 5 वी ते 8वी उच्च प्राथमिक गट व इयत्ता 9वी ते 12वी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात शाळेतील विद्यार्थ्यांची वकृत्व स्पर्धा घेण्यात आली एकूण 17 मुला मुलींनी आपली मनोगते व्यक्त केलीत त्यानंतर चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. इयत्ता 12वी कला शाखेची विद्यार्थिनी कु. जायसा केकड्या पावरा हिने *मी सावित्रीबाई फुले बोलते *या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात उच्च माध्यमिक शिक्षक श्री. संतोष शिंदे सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व जयपाल सिंग मुंडां यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. त्यानंतर शाळेतील *माध्यमिक शिक्षिका सौ. विद्या पाटील मॅडम यांनी आपल्या मनोगतात आदिवासी बोली भाषेचा वापर करून विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य सांगितले .
सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका म्हणून काम करत असताना किती अडीअडचणींना तोंड द्यावे लागले याच्या विषयी माहिती सांगितली. आज स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रांमध्ये काम करत आहे याचं श्रेय केवळ सावित्रीबाई फुले यांनाच देता येईल असे शाळेतील प्राथमिक शिक्षिका श्रीमती .सुवर्णा चौधरी मॅडम यांनी आपल्या मनोगतातून सांगितले .श्रीमती कविता कोळी मॅडम यांनी स्त्रीयांनी जगाला घाबरुन “जगाला घाबरू जगाव तरी कस व निरपराध असतांना बदनामीला घाबरुन मराव तरी कसं? या विषयी माहीती सांगितली . श्रीमती. ज्योती महाजन मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी आपली मनोगत व्यक्त केलीत . कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात माध्यमिक मुख्याध्यापक श्री. विजय महाजन सर यांनी सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना सांगितले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक विचार विद्यार्थी व शिक्षकांनी आचरणात आणा असे सांगितले. सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव व आद्य स्त्री शिक्षिका म्हणून 3 जानेवारी हा दिवस खऱ्या अर्थाने शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात यावा आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष मा. आप्पासाहेब उधदवराव महाजन व सचिव मा. दादासाहेब आदित्य महाजन व शाळेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षिका श्रीमती. कांचन मोरे मॅडम व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राथमिक शिक्षिका श्रीमती राजश्री धनगर मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले( शब्दांकन-श्री.किशोर शिंपी सर)