अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी होतं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उस्थितीत रामलल्ला गर्भागृहात विराजमान होणार आहेत.या सोहळ्याला देश भरातून संत, महात्मे आणि मान्यवर उपस्थित राहणार असून या दैदीप्यमान सोहळ्याची तयारी सुरु आहे
दरम्यान MIM एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत असून या व्हिडीओ मध्ये खासदार ओवैसी उपस्थित जनसमुदायला उद्देशून भाषण करतांना आपल्या तरुणांना पाठिंबा आणि ताकद कायम ठेवण्याचं आवाहन करताना दिसून येत आहेत.व्हिडीओमध्ये ओवैसी म्हणतात, तरुणांनो आपण आपली मशीद गमावली आहे. तिथे काय केलं जात आहे, ते आपण बघत आहोत. तुम्हाला याचा त्रास होत नाही? जिथे आपण ५०० वर्षे बसून कुराण-ए-करीमचं पठण केलं, आज ती जागा आमच्या हातामध्ये नाही.
ते पुढे म्हणतात, तरुणांनो, आणखी तीन ते चार मशिदींबाबत षड्यंत्र सुरु आहे. ज्यामध्ये दिल्लीतल्या मशिदीचाही समावेश आहे. या शक्ती तुमच्या मनातून ऐक्य काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी परिस्थिती तुम्हाला पाहिजे आहे का? या गोष्टीकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे.
असदुद्दीन ओवैसी पुढे म्हणतात, तुमची ताकद आणि तुमची एकता कायम ठेवा. मशिदी लोकवस्तीत ठेवा. कारण या मशिदी आपल्याकडून काढून घेतल्या जातील. आजचे तरुण उद्या म्हातारे होणार आहेत. त्यामुळे आपण स्वतःला, कुटुंबाला आणि शहराला कशी मदत करु शकतो, याचा विचार केला पाहिजे.अयोध्यातील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अगोदरच खासदार ओवेसी यांनी हे मोठं वक्तव्य केलं असून व्हिडीओ सोशल मीडियात मोठया प्रमाणात पाहिला जात आहे.अयोध्या पौळ पाटील यांनी एक्सवर टाकला आहे. दरम्यान news nine यांनी अपलोड केलेल्या या व्हिडीओ,ऑडिओची ‘ najarkaid.com पुष्टी करत नाही.
व्हिडीही पहा…
इतर बातम्या वाचा