साऱ्या जगाचं लक्ष लागलेल्या (Ayodhya Ram Mandir) आयोध्यातील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल.रामजन्मभूमी अयोध्येत बांधलेल्या भव्य राम मंदिराचा अभिषेक २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. तर रामललाचा प्राणप्रतिष्ठा १ मिनिट २४ सेकंद म्हणजेच ८४ सेकंदाच्या सूक्ष्म मुहूर्तावर केला जाईल.
दरम्यान यावेळी राम मंदिराच्या गर्भगृहात केवळ पाच लोक उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असतील व त्यांच्या समवेत RSS प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचा समावेश असेल. सकाळी १२.२९ ते १२:३० पर्यंत राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामललाच्या स्थापनेसाठी 17 जानेवारी ते 25 जानेवारी या 5 तारखांसह अनेक तारखांचे पर्याय दिले होते.पण काशीचे ज्योतिषी पंडित गणेशवर शास्त्री द्रविड यांनी २२ जानेवारी ही तारीख आणि शुभ वेळ निवडली.