इमारतीच्या जवळ असलेल्या एका सिसिटीव्ही कॅमेऱ्यात अंगावर शहारे येणारा व्हिडीओ कैद झाला असून Last Image या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.आपण अनेकदा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतांना पाहतो पण हा व्हिडीओ पहिल्या नंतर तुमचं मन नक्कीच सुन्न होईल.
काय आहे या व्हिडीओ मध्ये
Last Image या एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओ एक जोडपे इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर मन सुन्न होतं.व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहाल की इमारतीच्या बाजूला असलेल्या रस्त्याने तीन युवक नेहमी प्रमाणे जाताना दिसत आहे, तेवढ्यात इमारतीच्या वरच्या बाजूनं एक महिला आणि पुरुष खाली पडताना दिसते. तीन तरुणांच्या अगदी समोरच हे जोडपे रस्त्यावर पडते. हे पाहून ते तरुणही काही वेळ गोंधळतात मात्र नंतर नेमकं काय घडलंय हे पाहण्यासाठी पुन्हा ते तरुण या जोडप्याकडे धावतांना दिसत आहे तर कॉलनी परिसरातील लोक जमा झालेले पाहायला मिळत आहे.
https://twitter.com/rarelastimage/status/1738848153523380627?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1738848153523380627%7Ctwgr%5Ed05a21d7d30d267ffb09b6e6e3052e26882046db%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
Last Image या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीत एक जोडपे भांडत होते व चुकून खाली पडले आणि रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणांवर आदळले. या नवरा बायकोचा जीव वाचला की नाही, याविषयी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये काही माहिती देण्यात आलेली नाही किंवा हा व्हिडीओ कुठला आहे हे देखील सांगण्यात आलेले नाही त्यामुळे ही घटना कुठली याबाबत माहिती मिळू शकली नाही.
इतर बातम्या…
आधी कडेवर घेतलं, नंतर चुंबन घेतले ; विद्यार्थी आणि शिक्षिकेचे रोमॅंटिक फोटोसेशन व्हायरल
गर्लफ्रेंडसोबत हॉटेलला जाताय?, मिलियन मध्ये पाहिले जात आहेत ‘या’ विषयी व्हिडीओ ; अडचणीत येण्यापूर्वी हे 5 नियम लक्षात ठेवा
शिवसेना शिंदे गट हा भाजपमध्ये विलीन होणार ; ‘या’ नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
इन्स्टाग्रामवर जुळलं सूत ; लग्नाचे आमीष दाखवून एका २५ वर्षीय युवतीशी शारिरीक संबंध केले प्रस्थापित, गुन्हा दाखल