शिवसेना शिंदे गट हा भारतीय जनता पक्षात विलीन होणार हे शंभर टक्के खरे आहे आणि असंच होणार असा दावा काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.वडेट्टीवार यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सर्वत्र शिवसेना शिंदे गट हा भारतीय जनता पक्षात विलीन होणार याचं विषयावर गप्पा रंगताना दिसत आहे.
भाजपची चाल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कळेल
शिवसेना शिंदे गट हा भारतीय जनता पक्षात विलीन होणार यासोबतचं भाजपची चाल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कळेल, असा दावा देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार पुढे म्हणाले की,शिंदे गटाकडे भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. कारण ते स्वबळावर निवडणूक लढू शकणार नाहीत. याशिवाय भाजपही त्यांना स्वबळावर लढू देणार नाही. आता लोकसभेत त्यांना किती जागा मिळतील, हे कळेलच, असेही वडेट्टीवार म्हणाले. दोन दिवसांपूर्वी वडेट्टीवार यांनी राज्यात १० जानेवारीनंतर मुख्यमंत्री बदलणार असल्याचे भाकित केले होते.
आधी कडेवर घेतलं, नंतर चुंबन घेतले ; विद्यार्थी आणि शिक्षिकेचे रोमॅंटिक फोटोसेशन व्हायरल
गर्लफ्रेंडसोबत हॉटेलला जाताय?, मिलियन मध्ये पाहिले जात आहेत ‘या’ विषयी व्हिडीओ ; अडचणीत येण्यापूर्वी हे 5 नियम लक्षात ठेवा