युवकांच्या क्रीडा कौशल्य तसेच कला कौशल्यांना प्रोत्साहन देण्याकरिता भव्यदिव्य अशा “नमो चषकाचे” आयोजन भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून होत असून येत्या 12 जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेमध्ये क्रीडा प्रकारामध्ये क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, खो-खो, कॅरम, बुद्धिबळ रस्सीखेच, धावणे हे विविध प्रकार असून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा गायन ,वादन ,एक पात्री प्रयोग असे विविध स्पर्धेचे आयोजन नमो चषकाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्व युवक-युवती यांच्या साठी “नमो चषक स्पर्धा” खुला असल्याने जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार श्री.गिरीशभाऊ महाजन, खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे,बेटी बचावो बेटी पढाओ चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्रजी फडके, प्रदेश उपाध्यक्षा स्मिताताई वाघ, प्रदेश सचिव अजय भोळे, लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर, चंद्रकांत बाविस्कर, गोविंद सैंदाणे, संजय पाटील यांनी केले आहे. नोंदणीसाठी प्रत्येक विधानसभा व मंडळ स्तरावर संयोजकांची नियुक्ती करण्यात आलेली असून मुक्ताईनगर
(संयोजक विशाल झाल्टे,
आंबदास भाऊ)
जामनेर (संयोजक सुभाष पवार,
सुहास पाटील, अमर पाटील)
भुसावळ (संयोजक गोपीसिंग राजपूत,आनंदा प्रताप ठाकरे)
रावेर (संयोजक लखन महाजन,चेतन पाटील)
चोपडा (संयोजक रावसाहेब पाटील) बोदवड (राम आहुजा ,अमोल शिरपूरकर) यावल (संयोजक सागर कोळी) असे संयोजक नेमण्यात आलेले आहे. तसेच या नमो चषकासाठी ऑनलाईन नोंदणीची ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली असून namochashak.in या वेबसाईटवर जाऊनही ऑनलाईन नोंदणी खेळाडू व कलाकार करू शकतात.
जिल्ह्यातील सर्व जनतेसाठी ही स्पर्धा खुली असून नमो चषकामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा याकरिता जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.अमोल हरिभाऊ जावळे व भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री निलेश चव्हाण तसेच सर्व पदाधिकारी नमो चषक स्पर्धा या संदर्भात नियोजन करत आहेत.