जळगाव : आठवड्यापासून सोन्याच्या भावात पुन्हा वाढ होत असून, बुधवारी सोने ६३ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. तीन आठवड्यांनंतर सोने पुन्हा एकदा उच्चांकी भावावर पोहोचले असून, गुरुवारी (दि. २८) गुरुपुष्यामृत योगावर खरेदी आणखी वाढण्याचा अंदाज आहे. ४ डिसेंबर रोजी सोन्याचे भाव ६४ हजार ३०० रुपयांवर पोहोचून त्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्याच दिवशी ५ डिसेंबर रोजी एक हजार ३०० रुपयांची घसरण होऊन सोने ६३ हजारांवर आले
गुरुपुष्यामृत योगावर भाव काय होणार?
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढत असताना भारतातही लग्नसराईमुळे मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. त्यात गुरुवार, २८ डिसेंबर रोजी गुरुपुष्यामृत योग असल्याने या मुहूर्तावर सोने खरेदी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या दिवशी सोन्याचे भाव आणखी वाढतात की काय, याकडे ग्राहकांचे लक्ष लागलेले आहे.
होते. गेल्या आठवड्यांपर्यंत हे भाव कमी-कमी होत गेले. मात्र, गेल्या आठवड्यापासून पुन्हा त्यात वाढ सुरू झाली व २२ डिसेंबर रोजी सोने ६३ हजार १०० रुपयांवर पोहोचले. २३ रोजी ६३ हजार ३५० रुपये भाव होऊन २६ रोजी ते ६३ हजार ७५० रुपयांवर भाव पोहोचले. २७ डिसेंबर रोजी त्यात ५० रुपयांची घसरण झाली. मात्र, सोने पुन्हा एकदा ६४ हजारांच्या दिशेने जात आहे. चांदीचा भाव मात्र ७५ हजारांवर कायम आहे.