साऊथ फिल्म इंडस्ट्री मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेते आणि DMDK संस्थापक विजयकांत यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरवात केली आहे. कोरोनामुळे अभिनेत्याचा मृत्यू झाल्यामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. अभिनेते आणि DMDK संस्थापक विजयकांत यांना मंगळवारी श्वास घेण्यास त्रास होत होता यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.
विजयकांत यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, असं देखील पक्षाकडून सांगण्यात आले आहे. खोकला आणि घसादुखीमुळे ते १५ दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली होते. विजयकांत यांनी राजकारण आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांमध्ये यशस्वी कारकीर्द मागे सोडलीय. त्यांनी 154 सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
याशिवाय त्यांनी DMDK च्या माध्यमातून विधानसभेचे सदस्य म्हणून दोन टर्म भूषवल्या. ऋषिवंदियम आणि विरुधाचलम जिल्ह्यांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. 2011 ते 2016 या काळात त्यांची तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली.