पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा भडगाव तालुक्यातील उबाठा गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना वाढदिवसाचा उत्साह शमत नाही तोच त्यांना मोठा धक्का बसला असून दत्त जयंतीचे औचित्य साधत नगरपालिकेचे सलग तीन वेळा नगरसेवक व विविध समित्यांचे माजी सभापती पद भूषविलेले दत्तात्रय जडे तसेच युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख जितेंद्र जैन यांनी आमदार किशोर अप्पा पाटील यांचेवर विश्वास ठेवत शिवसेनेच्या शिंदे गटात पुर्नप्रवेश केला आहे.आगमी काळात पक्ष बळकटी साठी आपला प्रयत्न राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रवेश सोहळ्या नंतर दिली आहे.
आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या ‘शिवालय’ संपर्क कार्यालयात मंगळवारी दुपारी झालेल्या प्रवेश सोहळ्याला जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील,उपसभापती पी ए पाटील,भडगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील,अतुल पाटील,माजी जि प सदस्य पदमसिंग पाटील,भडगाव तालुका प्रमुख संजय पाटील(भुरा अप्पा) युवराज पाटील, बाजार समितीचे संचालक प्रकाश तांबे, राहुल पाटील,माजी सभापती पंढरीनाथ पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, डॉ.भरत पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी ,निरीक्षक कृष्णा मुळे, सतीश चेडे, महेंद्र ततार,स्वीय सहाय्यक राजेश पाटील, संदीप राजे यांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी त्यांचे शिवसेनेचा भगवा गळ्यात टाकुन शिवसेनेत स्वागत केले. दोघे ही कट्टर शिवसैनिक असून दरम्यानच्या काळातील काही गैरसमजातून ते दुरावले होते मात्र त्यांचा पुर्नप्रवेश निश्चितच आनंददायी असून त्यांना योग्य वेळी योग्य ती जबादारी देऊन त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल असा शब्द दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रवीण ब्राह्मणे यांनी मानले . यावेळी पाचोरा भडगाव तालुक्यातील शिवसेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.