Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्लीत हिंसक आंदोलन, गाड्यांची जाळपोळ, ४ मेट्रो स्टेशन बंद

najarkaid live by najarkaid live
December 15, 2019
in राष्ट्रीय
0
दिल्लीत हिंसक आंदोलन, गाड्यांची जाळपोळ, ४ मेट्रो स्टेशन बंद
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्लीः-  नागरिकत्व कायद्यावरून आज राजधानी दिल्लीत हिंसक आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी दक्षिण दिल्लीच्या के न्यू फ्रेंड्स कॉलनीत जाळपोळ केली. ३ बसेस व काही मोटरसायकल आगीत जळून खाक झाल्या. आग विझवण्यासाठी तात्काळ अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या परंतु, आंदोलनकर्यांच्या तावडीतून या गाड्याही सुटल्या नाही. त्यांनी या गाड्यांना आग लावली. यात अग्निनशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. त्यामुळे दक्षिण दिल्लीच्या चार मेट्रो स्टेशनवर जाणाऱ्या रस्त्यांवरचा प्रवेश बंद करण्याचा निर्णय मेट्रोने घेतला आहे.

नागरिकत्व विधेयकावरून देशभरात सुरू असलेले आंदोलन दिल्लीत धडकले. आज सकाळपासूनच आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन केले. जामियानगर ते ओखलाकडे मोर्चा निघाला. या आंदोलनात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा समावेश होता, असे सांगण्यात येत आहे. या मोर्चावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांत राडा झाल्याने हिंसक आंदोलन पेटले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारामुळे आंदोलन आणखी चिघळले. आंदोलनकर्त्यांनी बसेसवर दगडफेक केली. आंदोलनकर्त्यांनी हातात तिरंगा तसेच प्लेकार्ड घेऊन नागरिकत्व कायद्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.

मथुरा रोडवर आंदोलनकर्ते शांततेत बसून आंदोलन करीत होते. त्याचवेळी पोलिस त्या ठिकाणी आले व त्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत हुज्जत घातली. आंदोलनकर्त्यांनी विरोध करताच पोलिसांनी लाठीमार सुरू केला, असा आरोप काँग्रेस विद्यार्थी संघटना एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव सॅमन फारूखी यांनी पीटीआयशी बोलताना केला. यानंतर आंदोलनकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. हिंसक आंदोलनाचा फटका मेट्रो स्टेशनला बसला आहे. दिल्ली मेट्रोने ट्विट केले. दिल्ली पोलिसांच्या सल्ल्यानंतर मेट्रोने जामिया मिलिया इस्लामिया, ओखला विहार आणि जसोला विहाल शाहीन बाग मेट्रो स्टेशनवरील प्रवेश व बाहेर जाणारा रस्ता बंद केला आहे. या स्टेशनवर आता कोणतीही मेट्रो थांबणार नाही. तसेच आश्रम मेट्रो स्टेशनचे गेट नंबर ३ सुद्धा बंद करण्यात आले आहे. नागरिकत्व विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर आसाम, पश्चिम बंगाल व दिल्लीत तीव्र आंदोलन सुरू आहेत. आसाम व पश्चिम बंगालमधील काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरिकत्व दुरुस्ती कायदा सावरकरांच्या तत्वाविरोधी-उद्धव ठाकरे

Next Post

7 राज्यांच्या तीव्र विरोधानंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात बदल शक्य! गृहमंत्री अमित शहांनी दिले संकेत

Related Posts

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
Next Post
7 राज्यांच्या तीव्र विरोधानंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात बदल शक्य! गृहमंत्री अमित शहांनी दिले संकेत

7 राज्यांच्या तीव्र विरोधानंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात बदल शक्य! गृहमंत्री अमित शहांनी दिले संकेत

ताज्या बातम्या

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us