जळगाव,(प्रतिनिधी)- लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन केल्या प्रकरणी जळगाव शहरात भाजपाच्या वतीने आज दिनांक २१ डिसेंबर रोजी निषेध आंदोलन केले..
लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती मा.जगदीप धनखड यांचा (व्यंगत्वावर) अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन करीत होते आणि स्वतःला शहाणे म्हणवणारे राहुल गांधी हे त्याचे चित्रण करीत होते. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा), जळगाव पश्चिम चे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर व महानगर जिल्हाध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहरातील शास्त्री टॉवर चौक इथे ‘निषेधार्थ आंदोलन’ करण्यात आले.
याप्रसंगी जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, माजी उपमहापौर सुनील खडके, सरचिटणीस सचिन पानपाटील, उपाध्यक्ष रोहित निकम, महानगर सरचिटणीस अरविंद देशमुख, ज्योतीताई निंभोरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई वर्मा यांच्यासह अजय गांधी, मुकुंदा सोनवणे, कैलास सोमानी, गायत्री राणे, ज्योती निंभोरे, विठ्ठल पाटील, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, आनंद सपकाळे, मुकुंद मेटकर, प्रल्हाद सोनवणे, जयंत चव्हाण, सुरेखा तायडे, वंदना पाटील, राजश्री शर्मा, जहांगीर खान, जयेश ठाकूर, राहुल घोरपडे, सचिन बाविस्कर, अक्षय जेजुरकर, कैलास सोनवणे, कल्पेश सोनवणे, संजय शिंदे, संजय सोनवणे, दिनेश पुरोहित, राजेंद्र मराठे, धीरज वर्मा, जगदीश जोशी, दीपक कोळी,
भूपेश कुलकर्णी, बापू ठाकरे, स्वप्नील साखळीकर, प्रकाश पंडित, गणेश माळी, योगेश पाटील, प्रसिध्दी प्रमुख मुविकोराज कोल्हे व भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर चे सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, माजी नगरसेवक, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी, मोर्चा/ आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.