नागपूर- कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज मवाळ भूमिका घेत आहेत. सत्तेसाठी किची लाचारी ठेवायची, सत्तेसाठी सौदेबाजीची आवश्यकता नाहीस अशा शब्दात काँग्रेसच माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यावर मवाळ भूमिका घेतल्याची टीका करत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता जारदार टीकास्त्र सोडलं. देशभरात राहुल गांधी यांच्या सावरकरांचा अपमान करणाऱ्या वक्तव्या विरोधात उद्रेक सुरू झाला असून जो पर्यंत राहुल गांधी माफी मागत नाहीत, तो पर्यंत हे आंदोलन आता शांत होणार नाही.
नागपुरात उद्या हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीलामांडी लावून बसणाऱ्या शिवसेनेवर फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. इथे सौदेबाजी करण्याची आवश्यकता नाही. सत्तेची लाचारीमुळे सौदेबाजी करण्यात येत असून त्यांची सौदेबाजी त्यांना लखलाभ अशा टोला फडणवीस यांनी शिवेसेनेला लगावला.