विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे, कारण तुम्ही करियर बनविण्यासाठी एखाद्या एन्स्टिट्यूट अथवा संस्थेत पदवी अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला असेल आणि शैक्षणिक वर्ष संपल्या नंतर जर तुम्हाला सदर पदवी ही वैध नाही हे कळल्यास तुमचं प्रचंड नुकसान होऊ शकतं म्हणून त्या बाबत तुम्ही प्रवेश घेण्यापूर्वीच या बाबत खात्री करून घ्या अन्यथा तुमचं शैक्षणिक वर्ष, फि, वेळ सर्व वाया जाऊ शकतं, म्हणूनचं ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. विदेशी विद्यापीठांशी संलग्न असलेल्या अभ्यासक्रमांच्या पदव्या वैध नसल्याने एज्युटेक कंपन्यांबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना सतर्क केले असून यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
काय म्हटले युजीसीचे मनीष जोशी
मान्यताप्राप्त नसलेल्या विदेशी विद्यापीठांबरोबर सहकार्य करून भारतातील एज्युटेक कंपन्या व महाविद्यालये चालवित असलेल्या अभ्यासक्रमाच्या पदव्या वैध नाहीत. त्यामुळे अशा ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) केले तसेच अवैध पदवी अभ्यासक्रम चालविणे एज्युटेक कंपन्या, महाविद्यालयांनी बंद करावे, असाही इशारा दिला असून वैध विदेशी विद्यापीठांशी संलग्न असलेल्या ‘त्या’ अभ्यासक्रमांच्या पदव्या वैधनसलेले अभ्यासक्रम सुरु ठेवल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असं सांगण्यात आलं आहे.
एज्युटेक कंपन्याकडून अभ्यासक्रमाच्या जाहिराती प्रसिद्ध
अनेक उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालयांनी यूजीसीने मान्यता न दिलेल्या विदेशी शिक्षण संस्थांशी करार करून ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यांच्या पदव्या वैध धरल्या जाणार नाहीत. विदेशी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांना मान्यता नसेल, तर त्या अभ्यासक्रमाच्या पदव्याही अवैध ठरतात. तरीही एज्युटेक कंपन्या अशा अवैध अभ्यासक्रमांच्या जाहिराती प्रसिद्ध करत असतात, असे यूजीसीच्या निदर्शनास आले आहे..
वैध नसलेल्या पदव्या. डिप्लोमाचे अभ्यासक्रम ऑनलाइन शिक्षण पद्धतीद्वारे चालविण्यात येत आहेत, या गोष्टींची विद्यार्थी व पालक यांनी नोंद घेतली पाहिजे.अवैध अभ्यासक्रम चालविणाया एज्युटेक कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी दिला आहे.
#ugc #ugcnet #net #mouloudia #university #education #upsc #aicte #india #exam #currentaffairs #students #jrf #exams #college #umigreencoffee #ugcnetjrf #news #like #instagood #instagram #ssc #dalger #gk #cinema #covid #ntanet #nda #instadaily #newsupdate