जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयातील करिअर मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव- करिअरची निवड करताना अनेकदा पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे निकष हेच मुळी चुकीच्या संकल्पनेवर आधारलेले असतात. आपला मुलगा-मुलगी इंजिनीअरिंगला आहे- मेडिकलला आहे, हे सांगण्यात पालकांना धन्यता वाटते, आपली पत वाढल्यासारखी वाटते. तर विद्यार्थ्यांचा निर्णय हा मित्र-मैत्रिणींच्या निर्णयाला साजेसा असावा, असं वाटतं. यात तुमचा आतला आवाज काय सांगतो, याकडे विद्यार्थी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. आई-बाबांनी लादलेल्या अपेक्षा किंवा मित्र-मैत्रिणींचा आग्रह बाजूला सारून प्रत्येकाने अभ्यासक्रमाची निवड करायला हवी आणि ही निवड आपल्या क्षमता, आपले स्वारस्य याला अनुसरून असावी, अन्यथा त्या करिअरमध्ये यशही मिळत नाही किंवा समाधानही. त्यामुळे विध्यार्थ्यानी, रुचणाऱ्या आणि पेलणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करायला हवी असा सल्ला करिअर कौन्सिलर प्रा. राहुल त्रिवेदी यांनी विध्यार्थ्यांना दिला.
एल. एच. पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल वावडदा, उज्वल इंटरनॅशनल स्कूल जळगाव, पद्मालया इंग्लिश मिडीयम स्कूल शिरसोली व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविध्यालयाच्या वतीने रायसोनी महाविध्यालयातील सभागृहात आयोजित ‘दहावी, बारावीनंतरचे अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षांतील संधी’ या निःशुल्क मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, आज अनेक संधी उपलब्ध आहेत. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर त्या निवडता येतात. म्हणूनच आपल्यासमोरील आव्हानांना, सोसाव्या लागणाऱ्या कष्टांना आणि यशापयशाला सामोरे जाताना आपली उमेद जिवंत ठेवा. भारताला सोनेरी भविष्य आहे. जगभरात जिथे जातात, तिथे भारतीय विद्यार्थी चमक दाखवत आहेत. स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवा. पंखांमध्ये बळ एकवटण्यासाठी प्रयत्न करा. यश तुमचेच आहे. असे मत त्यांनी यावेळी स्पष्ट केले या कार्यशाळेला शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रायसोनी कनिष्ट महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद खराटे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत प्रा. सोनल तिवारी यांनी सूत्रचालन करून आभार मानले. तर आयोजनासाठी प्रा. पल्लवी भालेराव, प्रा. उज्वला मालुसरे, प्रा. शितल किनगे, प्रा. यामिनी जोशी, प्रा. दिपक पाटील, प्रा. राखी वाघ, प्रा. शुभांगी अहिरे, प्रा. अनिल सोनार, प्रा. प्रतिभा चिखले, प्रा. गणेश धनोकार, प्रा. उज्वला मालुसरे, प्रा. संदीप पाटील आणि प्रा. संतोष मिसळ यांनी सहकार्य केले.