इंस्टाग्राम ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले नंतर विश्वास संपादन करून मुलीशी विवस्त्र अवस्थेत व्हिडीओ कॉल करायला लावून तो स्क्रीन रेकॉर्डिंग करून तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे,दिवसेंदिवस फेसबुक, इंस्टाग्राम व अन्य सोशल मीडिया प्लॅटफार्म वरून मैत्री वाढविणे, हळू हळू मुलीचा विश्वास संपादन करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील चॅटिंग, विवस्त्र अवस्थेत कॉल करायला भाग पाडून व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून नंतर त्या व्हिडीओचा दुरुपयोग करून शरीरसंबंधाची मागणी करणे, त्यासाठी नकार दिल्यास आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याच्या घटना वाढल्या असून अनोळखी व्यक्तींशी मैत्री करतांना आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत.याप्रकरणी मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.सोशल मीडिया साईट इंस्टाग्रामवर हे फोटो अपलोड करण्यात आले होते. दिलदार खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
इतर बातम्या…
शिक्षक, शिक्षिकेने शाळेतचं भरवली कामक्रीडेची ‘शाळा’ ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ
दोरीने लपेटलेला ड्रेस तुम्ही पाहून व्हाल हैराण ; उर्फीने केला बोल्ड व्हिडिओ शेअर
चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी
विश्वास संपादन करून अल्पवयीन मुलीशी शाररिक संबंध ठेवले, नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी…
अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा
मिळालेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम या साइटवर आरोपीची तरुणीसोबत ओळख झाली हाती. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तरुणीला विश्वासात घेऊन आरोपीने विवस्त्र अवस्थेत तरुणीला विवर व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले व त्याचा स्क्रीन रेकॉर्डिंग करून तो सोशल मीडियावर बोगस अकाउंट करून वायरल केला.
याप्रकरणी पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी दिलदार खान याला अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहे.