एस. टी. महामंडळाने प्रवासात काही महिन्यापूर्वीच महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत जाहीर केली होती.दरम्यान या भाडे सवलतीला महिलावर्गाने प्रचंड प्रतिसाद दिल्याने अलीकडच्या काळात एसटी हाऊसफुल दिसायला लागल्या आहेत यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे, अशातच सरकारने पुन्हा नवीन योजना जाहीर केली असून सुरु असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात याबाबत जाहीर घोषणा केली आहे, यापुढे लहान मुलांना देखील एसटीचा प्रवास मोफत असणार आहे त्यामुळे आता लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एसटीने मोफत प्रवास असंचं म्हणावं लागेल.
प्रवाशांनी शासकीय सार्वजनिक सुरक्षित वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा. यासाठी सरकारने आणखी एक योजना आणली आहे. या योजनेत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना एसटीने मोफत प्रवास करता येणार आहे
मोफत सवलतीच्या अटी आणि शर्ती
महिलांना सर्व बसेसमध्ये ५0% सूट मिळणार आहे. साधी, छोटी बस, निमआराम म्हणजेच एशियाड, नॉन-अॅडजस्टेबल स्लीपर, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ही सवलत लागू असणार आहे.
महिलांसाठी सवलतीच्या तिकिटांचा रंगही वेगळा असणार आहे. प्रवासी भाडे आणि अपघात निधीवर जीएसटी लागू असेल. उदा. तुमचे तिकीट जर १० रुपये आहे तर तुम्हाला ५ रुपये आणि २ रुपये टॅक्स वजावट मिळेल. म्हणजेच तुम्हाला ७ रुपये तिकीट द्यावे लागणार आहे.
शहरी वाहतुकीवर महिलांना ही सवलत मिळणार नाही. त्यांना आरक्षणाच्या तिकीटावर प्रवास करायचा असेल तर त्यांना ही सूट लागू होणार नाही. ५ ते १२ वयोगटातील मुलींना ५०% सवलत मिळेल, कारण अमृत जेष्ठ नागरीक योजना ७५ वर्षांवरील महिलांसाठी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे.