पाचोरा-काँग्रेसचे झारखंड येथील राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर व कार्यालयावर आयकर विभागाच्या धाडिंमध्ये जवळपास 300 कोटींचे घबाड या काँग्रेस खासदारांच्या घरी व कार्यालयात सापडले आहे.
काँग्रेसच्या माध्यमातून सलग तीन वेळेस राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणारे धीरज प्रसाद साहू यांच्या या बेनामी संपत्तीमुळे ते चांगलेच अडचणीत आलेत असून झारखंड राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाची देखील मोठी गोची होताना दिसत आहे.या विषयावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेस व त्यांचे राज्यसभेचे खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या विरोधात देशभरात निषेध व आंदोलने केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव च्या वतीने विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती चौकात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने धीरज प्रसाद साहू यांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणा देत हा परिसर पदाधिकाऱ्यांनी दणाणून सोडला.याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील शहराध्यक्ष दीपक माने रेखा ताई पाटील साधनाताई देशमुख ललिता ताई पाटील समाधान मुळे जगदीश पाटील भैया ठाकूर वीरेंद्र चौधरी भावेश पटेल रोहन मिश्रा प्रदीप पाटील मच्छिंद्र पाटील अक्षय मंदाडे रामा जठार विकी मोरे आदी महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते