राज्यातील विदयार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी असून या बातमीने विदयार्थ्यांच्या शैक्षणिक मोठा बदल झाला आहे.शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये मोठी सुधारणा केली असून मूल्यांकन पद्धत बंद करण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता पास व्हावेच लागणार आहे.यापुढे ‘ढकलगाडी‘ बंद अर्थात विदयार्थ्यांना रेटून पुढच्या वर्गात पाठवल्या जाणार नाही असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
आता इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या वर्गांमधल्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी पाचवी आणि वार्षिक परिक्षेत उत्तीर्ण(pass) होणं बंधनकारक करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी निकष ठरवण्यात आले आहेत.
इतत्ता पाचवीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान १८ गुण आणि आठवीत उत्तीर्ण होण्यासाठी किमान २१ गुण सक्तीचे करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं हा मोठा निर्णय घेतला आहे.५ वीची वार्षिक परीक्षा ही ५० गुणांची तर आठवीची वार्षिक परीक्षा ६० गुणांची असणार आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे.
‘या’ गंभीर आजारावर आता ५ लाखापर्यंत मोफत उपचार ; असा घ्या लाभ
वार्षिक परीक्षेसाठी इयत्ता ५ वी आणि ८वी साठी वेगवगेळ्या पद्धतीची कार्यपद्धती असणार आहे. इयत्ता पाचवीसाठी ५० पैकी १८ गुण म्हणजेच ३५ टक्के असणं आवश्यक आहे. तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयात ६० पैकी २१ गुण म्हणजेच ३५ टक्के असणं गरजेचं असणार आहे. ५वी साठी सवलतीचे कमाल १० गुण आणि ८वी साठी कमाल ५ गुण देण्यात येतील. तसेच नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ही जून महिन्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती शासन निर्णयातून देण्यात आलीये.
मूल्यांकन पद्धत बंद
दरम्यानच्या काळात मुलांमध्ये नापास झाल्याने आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे १ली ते ८वी पर्यंत मूल्यांकन पद्धत आणण्यात आली होती. पण या मूल्यांकन पद्धतीमुळे मुलांची प्रगती खुंटत असल्याचं मत पालकांनी व्यक्त केले होते.दरम्यान हा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने बदलण्याचा निर्णय घेतला.
हे देखील वाचा….
राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी ; असे काढाल आभा आरोग्य कार्ड !
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाची मुदत वाढवली ; महिलांना मिळताय ‘हे’ मोठे लाभ
महिला व बालविकास विभागाच्या ‘या’ ५ योजनांचा लाभ घ्या ; संपूर्ण डिटेल्स वाचा
यावेळी पपई खाल्ल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे ! घ्या जाणून..