सरकार नेहमीच जनसामान्य लोकांसाठी कल्याणकारी योजना आणत असते, जगाने कोविड सारख्या गंभीर आजाराला तोंड देतांना आपण पाहिलं आहे. दरम्यान आरोग्य विभाग अपडेट करत असतांना समाजातील गरिबातला गरीब व शेवटच्या घटकाला आरोग्य सुविधा मिळावी या भावनेतून सरकारने सरकारने प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (Ayushman Bharat Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गरीब घटकातील लोकांना गंभीर आजारावर ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. पण याद्वारे कोणत्या आजारांवर उपचार केले जातात ते आम्ही तुम्हाला सांगतो. (Ayushman Cards)
Ayushman Bharat – Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY)
‘या’ आजारासाठी मिळतात ५ लाख रुपया पर्यंत मोफत उपचार
आयुष्यमान भारत (Ayushman Bharat Yojana) या योजनेंतर्गत देशातील सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना, कर्करोग, मूत्रपिंड, हृदय, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघा आणि हिप प्रत्यारोपण, वंध्यत्व, मोतीबिंदू आणि इतर ओळखल्या जाणाऱ्या गंभीर आजारांवर मोफत उपचार केले जातात. आता कोणते हॉस्पिटल मोफत उपचार देते, हे कसे शोधायचे हा प्रश्न पडतो, तर आम्ही तुम्हाला सांगतो.(Ayushman Cards)
लाभ घेण्यासाठी काय करावे…
आयुष्मान भारत योजनेचा(Ayushman Bharat Yojana) लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम आयुष्मान भारतच्या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला तुमचा रोग, मोबाइल नंबर, तुम्ही कोणत्या भागात राहता यासारखे तपशील येथे भरावे लागतील. यानंतर तुमच्यासमोर एक यादी येईल, जिथे रुग्णालयांची नावे आणि पत्ते दिले जातील.(Ayushman Cards)
कच्च्या घरात राहणारे लोक, भूमिहीन लोक, अनुसूचित जाती किंवा जमातीचे लोक, ग्रामीण भागात राहणारे, ट्रान्सजेंडर, दारिद्र्यरेषेखालील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी अर्ज करण्याचा अधिकार फक्त या लोकांना आहे. जर तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर यासाठी तुम्ही तुमच्या घरातील जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जाऊ शकता.(Ayushman Cards)
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, त्याच्या अधिकृत वेबसाइट mera.pmjay.gov.in वर लॉग इन करा.
- तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा एंटर करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो येथे टाका.
- तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. यानंतर तुम्ही राज्य निवडा.
- नाव, मोबाईल नंबर, रेशन कार्ड आणि इतर तपशील भरा.
- तुम्ही उजव्या बाजूला फॅमिली मेंबर टॅब करा आणि सर्व लाभार्थ्यांची नावे जोडा.
- ते सादर करा. त्यानंतर सरकार तुम्हाला आयुष्मान कार्ड देईल.
- यानंतर तुम्ही ते डाउनलोड करून नंतर कोणत्याही सरकारी रुग्णालयात वापरू शकता.
आपण टोल फ्री नंबर 14555 वर कॉल करुन सुद्धा आयुष्मान कार्ड लिस्ट मध्ये तुमचं नाव चेक करु शकतात (Ayushman Cards)
राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी ; असे काढाल आभा आरोग्य कार्ड !
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाची मुदत वाढवली ; महिलांना मिळताय ‘हे’ मोठे लाभ
महिला व बालविकास विभागाच्या ‘या’ ५ योजनांचा लाभ घ्या ; संपूर्ण डिटेल्स वाचा
यावेळी पपई खाल्ल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे ! घ्या जाणून..
#pmjay #ayushmanbharat #covid #healthforall #hospital #doctors #stayhome #nurse #health #stayathomestaysafe #nationalhealthcare #nhs #sanitizerhand #wash #sanitizer #care #ayshmanbharat #washinghands #nationalhealthservice #novelcorona #novelcoronavi #coronavairus #covi #sanitizercorona #sanitizingcovid #police #coronaindia #coronavairusindia #covidstats #coronamemes