सत्ता येते आणि जाते….पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा… असं म्हणत नवाब मलिकांना महायुतीत घेण्यावर विरोध करत देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांना थेट पत्र लिहलं असून यावरून महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे.हीवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अजित पवारांना पाठिंबा देत सत्ताधारी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला. यावरुन सभागृहात जोरदार खडाजंगी झाली दरम्यान विरोधकांनी याबाबत देवेंद्र फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान नवाब मलिकांच्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांच्या सत्तेतील सहभागाला विरोध केला आहे. तसे पत्र त्यांनी अजित पवारांना लिहले आहे.सदर पत्र देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडीयावर देखील शेअर केले आहे.
सत्ता येते आणि जाते.
पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा… pic.twitter.com/WDzm3Pjo3f— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2023
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे Nawab Malik यांच्यावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. अधिवेशनामध्ये झालेल्या खडाजंगीनंतर भाजप नेते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या महायुतीतील प्रवेशाला विरोध केला असून तसे पत्र त्यांनी Ajitdada pawar यांना लिहले आहे. सत्तेपेक्षा देश महत्वाचा असे म्हणत त्यांनी मलिकांना महायुतीत घेणे योग्य नसल्याचे म्हणले आहे.
फडणवीसांनी लिहलेल्या पत्रात काय म्हटलं आहे
माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.
परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे..” असे devendra fadanvis म्हणालेत.
“आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.”
“त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.” असे फडणवीस या पत्रामध्ये म्हणालेत.