बीड – बलात्कार, अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतांना दिसत असून ८ वर्षाच्या चिमुकल्या बालिकेवर एका पडक्या खोलीत नेऊन तिच्यावर ३ अल्पवयीन बालकांनी अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून घटनेने बीड हादरलं आहे. या प्रकरणात तिघां बालकांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आहे.
प्राप्त माहिती नुसार रविवारी सायंकाळी उशिरा ८ वर्षांची बालिका घरातील भंगार सामान वस्तू जवळच्या भंगाराच्या दुकानावर विक्रीसाठी घेऊन जात असताना ३ अल्पवयीन मुलांनी तिला बळजबरीने एका पडक्या खोलीत नेले. त्या ठिकाणी तिच्यावर तिघांनी आळी पाळीने सामूहिक अत्याचार केला. दरम्यान काहीतरी चुकीचं कृत्य सुरु असल्याचे तेथील एकाच्या लक्षात आल्याने त्या व्यक्तीने मुलांना हटकले असता हा प्रकार उघडकीस आला. मुलांच्या तावडीतून बालिकेची सुटका करत तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणात पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध सामूहिक अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.