जळगाव, दि. ३ (प्रतिनिधी) – जळगाव रनर्स ग्रृपच्या पुढाकाराने आयोजित ‘खान्देश रन-२०२३’ महोत्सवामध्ये जैन इरिगेशनचे सुमारे १४०० सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. यातील अनेकांनी २१, १०, ५ आणि ३ कि.मी. असे गट होते. सकाळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्यासह डॉ.प्रीती अग्रवाल, बच्छाव सर यांनी झेंडी दाखवून ३ कि.मी. रन आरंभ झाला.यात विशेषतः महिला सहकाऱ्यांचा विशेष सहभाग दिसून आला. खान्देश रन महोत्सवाचे हे सातवे वर्ष होय.
![](https://najarkaid.com/wp-content/uploads/2023/12/RTM9925-scaled.jpg)
आरंभी ‘खान्देश रन’च्या ७ व्या मॅरेथॉनची २१ किलोमीटर गटाची पहाटे साडे पाच वाजता सुरूवात झाली. जैन इरिगेशनच्या प्लास्टीक पार्क, टिश्यू कल्चर पार्क टाकरखेडा, जैन एग्री पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन फूड पार्क, डिव्हाईन पार्क मधील सहकारी, अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती स्कूल प्रायमरी, अनुभूती स्कूल सेकंडरी मधील विद्यार्थी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी, भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाउंडेशन सहकारी, जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्साहाने खान्देश रन महोत्सवात सहभाग घेतला. खान्देश रन मध्ये नोंदणी झालेल्या एकूण संख्येपैकी ४० टक्के सहकारी हे जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड चे होते हे विशेष. यात वरिष्ठ सहकाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता.
जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. च्या सर्वच सहकाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन निर्णय घेऊन कार्य करीत असते. कंपनीच्या सर्व सहकाऱ्यांचे आरोग्य उत्तम असावे असा उदात्त हेतु जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा होता. “माझ्या सहकाऱ्याने व्यसनांच्या आहारी जाऊ नये, त्याचे आरोग्य चांगले रहावे.” असा कटाक्ष त्यांचा होता. ह्या विषयी नंतरच्या पिढीने देखील श्रद्धेय भाऊंची तत्त्वे, विचारसरणी आणि कृतीशिलता पुढे कायम ठेवली आहे. आरोग्याच्या दृष्टीने सजग होत, निरोगी आयुष्यासाठी धावणे ही चळवळ चालत राहावी, यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाकडून सहकाऱ्यांना या रन मध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली जाते.