जळगाव,(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाला राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड निवडणुकीत मिळालेल्या विजयानिमित्त ‘वसंतस्मृती’शहर कार्यालयात रविवारी जल्लोष करण्यात आला.यावेळी कार्यकर्त्यांकडून पेढे करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या विजयरथाची आगामी काळातही अशीच घोडदौड सुरू राहील, असा दावा आ. राजुमामा भोळे यांनी यावेळी केला.
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड या चार राज्यांचे निवडणूक कल आता पूर्णपणे समजले आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात कांटे की टक्कर सुरु आहे.मध्य प्रदेश विधाससभेच्या २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. मध्य प्रदेशात यंदा विक्रमी ७६.२२ टक्के मतदान झाले. हे विक्रमी मतदान भाजपच्या पथ्यावर पडलेले दिसत आहे. भाजपने १४० जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस ८५ जागांवर आघाडीवर आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. आत्तापर्यंतच्या ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे या विजयाचा आनंदोत्सव ढोल ताशांच्या गजरात फटाके आमदार सुरेश(राजू मामा)भोळे यांच्या हस्ते फोडून आज. दि. 3 डिसेंबर २०२२ रविवार रोजी 1 वाजता भाजपा कार्यालय वसंत स्मृती भाजपा कार्यालयात यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, लोकसभा प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, संघटन सरचिटणीस अरविंद देशमुख, माजी उपमहापौर डॉ .अश्विन सोनवणे, अजय गांधी, महेश जोशी, रोहित निकम, माजी नगरसेविका सुचिता हाडा, दीपमाला काळे, दीप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, भाग्यश्री चौधरी, आनंद सपकाळे, राहुल पाटील, राजू मराठे, प्रकाश बालानी, यशवंत पाटील, कैलास सोमानी, अमित देशपांडे, शक्ती महाजन, चेतन शर्मा, धीरज वर्मा, राहुल मिस्त्री, अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, महेश चौधरी, मुकुंद मेटकर, अतुल बारी, अमय राणे, क्षितिज भालेराव, मुकुंदा सोनवणे, केशव नारखेडे, उदय भालेराव, प्रल्हाद सोनवणे, अशोक राठी, प्रकाश पंडित, दिलीप नाझरकर, अनिल जोशी, विजय राजपूत पाटील, राहुल पाटील, दीपक कोळी, ललित बडगुजर, जयंत चव्हाण, अरुण श्रीखंडे, प्रसिध्दी प्रमुख मुविकोराज कोल्हे यांनी फटाके फोडून व पेढे वाटप करून विजयोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला.