हे पण वाचा.….
गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?
कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?
जर तपासांती सदरचा गुन्हा खोटा आणि द्वेषबुद्धीने दाखल केलेला आहे असे निष्पन्न झाले तर पोलीस गुन्ह्यांचा शेवट “खटल्यासह ब समरी”(B final with Prosecution) असा करतात. यामध्ये सदर व्यक्तीने दाखल केलेला गुन्हा खोटा असून त्याचे विरोधात भारतीय दंड विधान कायदा कलम 182 आणि 211 प्रमाणे कारवाई करण्यात यावी असा रिपोर्ट मेहरबान न्यायालयाला देऊन त्याचे विरोधात खटला दाखल केला जातो. पुढे या खटल्यावर कोर्टात सुनावणी होऊन त्यानुसार असा खोटा गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीबाबत कोर्ट योग्य तो निर्णय देते.
याशिवाय ज्या व्यक्ती विरोधात असा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे अशी व्यक्ती स्वतः हाय कोर्टात एफ आय आर क्वाशिंग करिता भारतीय प्रक्रिया संहिता कलम 482 अन्वये प्रकरण दाखल करू शकते, जर पोलीस तपासात व न्यायालयात योग्य व पूरक पुरावे सादर केल्यास सदर दाखल खोटी फिर्याद रद्द करण्याचे आदेश मे. न्यायालय देते.
Comments 1