राज्यातील १७ लाख कर्मचारी आणि शिक्षक १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत याबाबत राज्य समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती समन्वय समितीचे निमंत्रक पी.एन. काळे, डी.जी. मुलाणी यांनी आज दिनांक ३० गुरुवार रोजी सांगलीत माध्यम प्रतिनिधिशी बोलताना दिली.
अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्याला संतुष्ट करणे हे एक काम होते…अजून काय म्हणाले वाचा…
संपावर जाण्यासाठी ‘या’आहेत मागण्या
राज्यातील कर्मचाऱ्यांना सरसकट सर्वांना जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाली पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण रद्द करा यासह अन्य मागण्यांसाठी बेमुदत संप करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री यांनी लेखी हमी देऊनही पूर्तता नसल्याने संप
सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मार्च २०२३ मध्ये बेमुदत संप केला होता. संपात मध्यस्थी करुन संघटना प्रतिनिधींशी चर्चा करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची लेखी हमी देत आश्वासन दिले होते.
अन्य मागण्यांबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. शासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण होण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून राज्य सरकारला वेळ दिला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे नाशिक येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यातील १७ लाख कर्मचारी, शिक्षकांनी १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे.