जळगाव- लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी हा देशभरात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत. सक्षम नेतृत्वाचा हा दमदार विजय आहे, असेच म्हणावे लागेल. गेल्या पाच वर्षांत भाजपा सरकारने केलेल्या कार्याची पावतीच मतांच्या रुपाने लोकांनी दिली असल्याचे या निवडणुकीतून दिसून येत आहे. भाजपा सरकारने घेतलेल्या अनेक धाडसी निर्णयांमुळे विकासाची नवी दालने उघडली गेली आहेत आणि हीच गोष्ट सर्वसामान्य माणसाच्या पसंतीला उतरली आहे. जागतिक पातळीवर भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने सक्षम नेतृत्त्व मिळाले आहे. जागतिक बाजारपेठेत देखील या निवडणूकीचे सकारात्मक परिणाम लवकरच बघायला मिळू शकतील. आता या नव्या सरकारची जबाबदारी आणखी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या जाहीरनाम्यात शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी २५ लाख कोटींची तरतूद करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. आगामी काळात या आश्वासनाची पूर्तता योग्य रितीने व्हावी ही अपेक्षा शेतकरी आणि शेतीपूरक व्यावसायिकांची निश्चितच असेल. शेतीमध्ये क्रांतीकारी बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी नक्कीच करतील असा विश्वास आहे. यासाठी तमाम शेतकरी बंधूसाठीच सतत कार्यरत असणाऱ्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या वतीने हृदयापासून शुभेच्छा.
– अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव.