अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीत ‘सेक्स ‘ बद्दल मोठं वक्तव्य केलं असून पती पत्नीच्या नात्यावर अनेक परखड मतं मांडली आहे. त्या म्हणतात की “माझ्या पिढीला सेक्सची फारशी गरज नव्हती. नवर्याला संतुष्ट करणे हे एक काम होते. स्वतःच्या आनंदाला प्राधान्य देणं त्या काळात खूप अवघड होतं. केवळ नवऱ्याला खुश ठेवायचे होते त्यात कुठेही प्रेमाची उब नसायची. महिलांना जेव्हा प्रेमाची गरज असायची तेव्हा त्यांना कुणीही विचारायचे नाही. मुलं झाल्यानंतर त्या त्यांच्या मुलांकडून आनंद मिळवायच्या. यादरम्यान त्या स्वत: ची काळजी घेणं विसरल्या आणि हे चक्र पुढे असंच सुरु राहिलं, असं त्या यावेळी मुलाखती दरम्यान बोलत आहेत.
यापुढे अभिनेत्री म्हणाली, “प्रत्येक रोमँटिक नातेसंबंध वासनेने सुरु होते. तुम्ही एखाद्याकडे त्यांच्या नोकरीमुळे, त्यांच्या शरीरामुळे, त्यांच्या मनामुळे आकर्षित होतात. हे वासनेअंतर्गत घडणे बंधनकारक आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही मित्र बनता, एकत्र राहू लागता, लग्न करता तेव्हा तुम्ही एकमेकांची काळजी करू लागता. याला तुम्ही प्रेम असंही म्हणू शकता” असंही ती म्हणाली.
दिलेल्या एका मुलाखतीत नीना यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ती विशेष चर्चेत आली आहे. रणवीर अलावादियासह झालेल्या मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता यांनी स्त्रीवादापासून ते अगदी लेकीच्या घटस्फोटाबाबत भाष्य केले.
नीना गुप्ता यांची ही मुलाखत सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. मुलाखतीदरम्यान अभिनेत्री नीना गुप्ता म्हणाल्या की, “खरे प्रेम फक्त पालक व मुलांमध्ये असू शकते, जोडीदारामध्ये नाही”. स्वतःच्या भूतकाळाचा आढावा देत ती म्हणाली, “स्त्रियांना त्यांच्या पतीला संतुष्ट करण्यास शिकवले जाते आणि त्या बदल्यात मात्र स्त्रियांनी कशाचीही अपेक्षा करू नये. आजही अनेक स्त्रिया प्रेमविरहित विवाहात अडकल्या आहेत. त्यांच्याकडे यातून बाहेर पडण्याचा मार्गही नाही” असंही त्या म्हणाल्या.
Comments 1