जळगाव,(प्रतिनिधी): विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने आज दिनांक ३० गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश’ मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात काढण्यात येत असून या आक्रोश मोर्चात ३०० ट्रॅक्टर व १० बैलगाडींसह हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती समन्वयक शेखर माने यांनी पत्रपरिषदेत दिली.यावेळी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, रिंकू चौधरी, सुनील माळी, दीपक वाघमारे, अतुल पाटील आदी उपस्थित होते.
मोर्चेकऱ्यांचे ट्रॅक्टर कृषी उत्पन्न बाजारात दाखल होणार आहे. दुपारी १ वाजता हा मोर्चा अजिंठा चौफुलीवरून नेरीनाका, पांडे चौक आणि तेथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येईल त्यानंतर सभेत रूपांतर होईल. प्रदेश अध्यक्ष आमदार एकनाथ खडसे, डॉ. सतीश कार्यालयासमोर दाखल होईल. मोर्चाचे जयंत पाटील, अरुणभाई गुजराथी, पाटील आदी मार्गदर्शन करतील..
नियोजनासाठी तालुकानिहाय बैठका घेण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १५ जिल्ह्यात मोर्चा काढण्यासाठी राज्यस्तरावरून नियोजन केले जात आहे. त्यासाठी पक्षीय संहिताही आखण्यात आली आहे. त्यानुसार हस्तपत्रकांवर राज्यस्तरीय पदाधिकारी, नेते, जिल्हानिहाय स्थानिक नेत्यांना स्थान देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. असेही माने म्हणाले.