आज बहुतांश लोक स्मार्ट फोनचा वापर करतात… स्मार्ट फोन आला म्हणजे इंटरनेट आलेच समजा… इंटरनेट शिवाय स्मार्ट फोन कोणी वापरातच नाही… जगभरातील जवळपास लोकापर्यंत इंटरनेटचं जाळं पोहोचलं आहे. गूगलवर माहिती शोधणे, माहिती मिळवणे यासह अनेक गोष्टी शोधल्या जातात मात्र गुगलवर काही शब्द सर्च करणे खूप महागात पडू शकतात. गुगल (इंटरनेट) वर काही चुकीचे शब्द सर्च केल्याने थेट तुरुंगवारीही होऊ शकते.
या गोष्टी सर्च करू नये
गुगलवर सर्वच बाबींची माहिती एका क्लिकवर मिळते. मात्र, बेकायदेशीर मजकूर शोधल्यास तुम्ही कायद्याच्या कचाट्यातही सापडू शकता.उदाहरण सांगायचं झालं तर गुगलवर बॉम्ब बनविणे आणि घरात बंदूक तयार करणे असं सर्च करणं महागात पडू शकतं.भारतात या गोष्टी करणे बेकायदेशीर आहे त्यामुळे अशा बाबी शोधणे तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते.
चाइल्ड पोर्नोग्राफी
भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात कठोर कायदे आहेत. तुम्ही चुकूनही याबाबत मजकूर सर्च केल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते.तुम्ही काय सर्च करतात याबाबत संपूर्ण तपशील संबंधित विभागाला तात्काळ मिळतो आणि असे कंटेन्ट तुम्ही सर्च केल्यास तुम्हाला पोलीस ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करतील.
गर्भलिंग तपासण्याबाबत सर्च करणे
भारतात गर्भलिंग तपासणी करणे कायद्याने गुन्हा आहे. याच कारणासाठी तुम्ही गुगलवर सर्च करत असाल तर यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते.
कस्टमर केयर सर्च करणे टाळा
आजकाल बहुतांश कंपन्या ग्राहक सेवेच्या सुविधा देतात. अनेकदा युजर ग्राहक सेवेसाठी इंटरनेटवर संबंधित नंबर सर्च करतात. मात्र, याचा गैरफायदा काही जण घेतात.काही जण इंटरनेटवर seo च्या मदतीने बनावट वेबसाईट तयार करतात. या वेबसाईटवर बनावट नंबर उपलब्ध असतात. या नंबरवर कॉल केल्यानंतर ग्राहकाची फसवणूक करण्यात येते. त्यामुळे इंटरनेटवर कस्टमर केयरचा नंबर सर्च करणे टाळले पाहिजे.