जळगाव,(प्रतिनिधी) – राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जामनेर तालुका राजपूत समाज बांधवांच्या वतीने सत्कार सोहळा सोमवार दिनांक 13 रोजी रात्री ठीक 8 वाजता जळगाव येथील हॉटेल रॉयल पॅलेस येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राष्ट्रीय राजपूत सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रवीणसिहं पाटील, खान्देश विभाग अध्यक्ष विलाससिह पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थित नवनियुक्त पदाधिकारी यांचा जाहीर सत्कार राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जामनेर तालुका राजपूत समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गेल्या महिन्यात राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र, खान्देश विभागीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली.यामध्ये जळगाव येथील उद्योजक श्री प्रवीणसिंह पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून
श्री.विलाससिंह पाटील (मुक्ताईनगर) यांची खान्देश विभागीय अध्यक्ष म्हणून तर विठ्ठलसिंह मोरे (जळगाव)यांची खान्देश कार्याध्यक्ष म्हणून,श्री भगवानसिंह खंडाळकर (जळगाव)यांची जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी
श्री.महेंद्रसिंह पाटील (जळगाव) यांची खान्देश उपाध्यक्ष पदी,श्री दामोदरसिंह राजपूत (भुसावळ)यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी श्री.संदीपभाऊ राजपूत(भुसावळ )यांची जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष पदी निवड करण्यात आली होती यांचाही यावेळी सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
प्रवीणसिहं पाटील यांचा विशेष सन्मान
समाजहित जोपसणारे प्रवीणसिंह पाटील यांना नुकताच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संघटनेतर्फे राजपूत समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.त्या निमित्त संघटनेच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
नवनियुक्त पदाधिकारी हे सामाजिक क्षेत्रात अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावत आहेत.त्यांच्या कार्याची दखल विविध संघटना घेत आहेत.त्यामुळे त्यांचा सत्कार करणे ही त्यांना प्रेरणा देणारी गोष्ट निश्चित ठरते.
या सत्कार सोहळ्यासाठी जामनेरहून
प्रा.डी.एस.पाटील सर(अध्यक्ष केसरीया प्रतिष्ठान),
श्री.रमेशसिंह राजपूत (उपाध्यक्ष, केसरीया प्रतिष्ठान)
निवृत्त पोलिस निरीक्षक श्री.कैलाससिंह जाधव साहेब
श्री.दामोदर पाटील सर,(निवृत्त शिक्षक),
दीपक शंकर राजपूत (उपाध्यक्ष महाराणा उत्सव समिती जामनेर तालुका)
श्री.एस.आर.पाटील सर(शिक्षक,कापूसवाडी)
श्री.एन.एल.पाटील सर(जामनेर)
प्रा.महेंद्रसिंह राजपूत (प्राध्यापक- नेरी महाविद्यालय)
श्री.मनोहर अजाबसिंह पाटील (मुख्याध्यापक तोरनाळा हायस्कूल)
श्री.महेंद्रसिंह महाले सर(मुख्याध्यापक फत्तेपूर),श्री.पृथ्वीराज पाटील( कापूसवाडी हायस्कूल)
शुभम राजपूत (ओझर) तसेच
डॉ विश्वजीत भुजंगराव सिसोदिया (अध्यक्ष महाराणा उत्सव समिती, जामनेर तालुका)इत्यादी मान्यवर उपस्थित होते. भुसावळ येथून श्री आनंद पाटील, श्री ईश्वर जाधव, जळगाव उपस्थित होते या कार्यक्रमात,प्रा.डी.एस पाटील, सरश्री एस.आर.पाटील सर व डॉ विश्वजीत सिसोदिया सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सत्कारमूर्तींचा गौरव केला.त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.श्री.विलाससिंह पाटील साहेब यांनी संपूर्ण टीमच्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा मांडला तर अध्यक्षीय भाषणात श्री प्रवीणसिंह पाटील यांनी भविष्यातील योजना सर्वांच्या समोर मांडून उपस्थितांना धन्यवाद दिले
या सर्वांना भावी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा