जळगाव,(प्रतिनिधी)- राज्यातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे केली असून यांनतर राज्य सरकारची समिती संपूर्ण राज्यात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर करत असून दरम्यान जळगाव जिल्ह्यात दीड लाखापेक्षा जास्त कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या आहेत.
अनेक जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी शोधण्याचं काम वेगाने सुरु आहे. याच दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसात दीड लाखाहून अधिक कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या आहे.राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या चार दिवसांपासून कुणबी नोंद शोध समितीचे जिल्हा स्तरीय कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाभरात वेगवेगळ्या विभागामार्फत सर्व तालुक्यांमध्ये या कक्षामार्फत कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे.
गेल्या चार दिवसात १९४८ ते १९६९ साल तसेच १९४८ सालापूर्वीची जिल्हाभरात एकूण ३६ लाख ९० हजार एवढी अभिलेख तसेच कागदपत्र तपासण्यात आली आहेत. यात १ लाख ५१ हजार ९४८ एवढ्या कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या आहेत. अशी माहिती कुणबी नोंद शोध मोहीम जिल्हाअधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.