राज्यातील बेरोजगार युवकांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची एक उत्तम संधी चालून आली आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने विविध गट ब आणि गट क पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.त्यानुसार एकूण ४४९७ रिक्त पदांवर भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०२३ आहे.
ही पदे भरली जाणार?
या भरती अंतर्गत, वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक : ६० टक्के गुणांसह भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र/ भूगर्भ शास्त्र किंवा कृषी (मृद शास्त्र/ कृषी रसायन शास्त्र) विषयामध्ये पदव्युत्तर पदवी.
निम्नश्रेणी लघुलेखक : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण + लघुलेखन १०० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक : भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र/ भूगर्भ शास्त्र किंवा कृषी (मृद शास्त्र/ कृषी रसायन शास्त्र) विषयामध्ये पदव्युत्तर पदवी.
भू वैज्ञानिक सहाय्यक : द्युतीय श्रेणी भुगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भुगर्भ शास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा भारतीय खनिकर्म, धनबाद येथील भुगर्भ शास्त्र उपयोजित भुगर्भ पदविका किंवा समकक्ष.
आरेखक : स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत पदविका + ३ वर्षे अनुभव.
सहाय्यक आरेखक : स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत पदविका.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका.
प्रयोगशाळा सहाय्यक : भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र भूगर्भ शास्त्र विषयातील पदवी किंवा कृषी शाखेतील पदवी.
अनुरेखक : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण + आरेखक स्थापत्य विषयात ITI किंवा शासनमान्य कला/ रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका.
दफ्दर कारकुन : कोणत्याही शाखेची पदवी + इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
मोजणीदार : कोणत्याही शाखेची पदवी + इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
कालवा निरीक्षक : कोणत्याही शाखेची पदवी + इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
सहाय्यक भांडारपाल : कोणत्याही शाखेची पदवी + इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक : भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र/ गणित/ इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण किंवा औद्योगिक संस्थेचा भूमापक (सर्वेक्षण) अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी शाखेतील पदविका धारकाला प्राधान्य.
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे. (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
अर्ज फी –
खुला/ ओबीसी – १०००रुपये.
मागासवर्गीय – ९०० रुपये.