भुसावळ : तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून तीन ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. शनिवारी सर्वच मतदान केद्रावर मतदान कर्मचारी रवाना झाले आहे. तालुक्यातील वराडसीम-जोगलखोरी, चोरवड, सुनसगाव, फुलगाव, गोजोरे, अंजनसोंडे, विल्हाळे येथे पंचवार्षिक निवडणूक होत आहे तर शिंदी, हतनूर व मांडवेदिगर येथे पोटनिवडणूक होत आहे. यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात मतदान साहित्याचे वाटप तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. एका मतदान केंद्रावर पोलिसासह सहा कर्मचार्यांंची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुक्यातील सा ग्रामपंचातीसाठी पंच वार्षिक निवडणूक तर तीन ग्रामपंचायतीत रविवार, 5 रोजी पोटनिवडणूक होत आहे. 167 मतदारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. शनिवारी मतदान केंद्रावर कर्मचारी मतदानाचे साहित्य घेऊन रवाना झाल्यानंतर रविवारी सकाळी शांततेत मतदानाला सुरूवात झाली.
60 सदस्य पदासाठी तर 7 लोकनियुक्त सरपंच पदासाठी रविवारी मतदान होणार आहे. सदस्या पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात 167 उमेदवार आहे. मतदानासाठी लागणारे 27 कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट घेऊन कर्मचारी रवाना झाले आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानाला शांततेत सुरूवात झाली.