जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील एम.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता या दोन वर्षीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश पूर्व परीक्षा (सी.ई.टी) आज दिनांक 18 जून 2019 रोजी घेण्यात येणार आहे.
एम.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाला कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. प्रवेशाकरीता प्रवेश पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. विभागातर्फे ही प्रवेश पूर्व परीक्षा उद्या मंगळवार, दि.18 जून 2019 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 या वेळेत विभागात घेण्यात येणार आहे. पदवी परीक्षेला अॅपीयर विद्यार्थी देखील ही परीक्षा देवू शकतात.
प्रवेश पूर्व परीक्षेसाठी मागासवर्गीय संवर्गातील विद्याथ्र्यांसाठी (एस.सी., एस.टी., एन.टी., व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी., एस.ई.बी.सी., ई.डब्ल्यू.एस.) रू. 150/- तर ओ.बी.सी. व खुल्या संवर्गातील विद्याथ्र्यांसाठी रू. 200/- नोंदणी शुल्क आहे. प्रवेश पूर्व परीक्षा 100 गुणांची असून लेखी परीक्षा 70 गुणांची असेल. ज्यात वस्तूनिष्ठ प्रश्न 40 गुणासाठी तर विस्तृत प्रश्न 30 गुणांसाठी विचारण्यात येईल. प्रश्न हे चालू घडामोडी व सामान्य ज्ञानावर आधारित असतील. मौखीक परीक्षा 20 गुणांसाठी घेण्यात येईल. यात वौयक्तिक मुलाखत व समूहचर्चा घेण्यात येणार आहे. याशिवाय 10 गुण अधिकच्या शौक्षणिक गुणवत्तेसाठी राखून ठेवण्यात आले आहे.
एम.ए.एम.सी.जे.ला प्रवेश घेऊ इच्छिणाज्या विद्याथ्र्यांनी प्रवेश पूर्व परीक्षेच्या दिवशी सकाळी 10.00 वाजता विभागात उपस्थित रहावे. ज्या विद्याथ्र्यांनी अद्याप नाव नोंदणी केली नाही अशाही विद्याथ्र्यांना परीक्षेच्या दिवशी नावनोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी इच्छुक विद्याथ्र्यांनी विभागप्रमुख डॉ.सुधीर भटकर यांच्याशी 9423490044, 9860046706 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक डॉ.अनिल चिकाटे यांनी केले आहे.