नवी दिल्लीतील गौतमपुरी येथील रहिवासी असलेले भारतातील पिता-पुत्र, अफगाणिस्तान सीमा मार्गातून पाकिस्तानात पोहोचल्या नंतर बाप लेकांनी ‘आम्हाला ठार मारा पण आम्ही भारतात परतणार नाही..’असं थेट पाकिस्तानी मीडिया समोर जाहीर वक्तव्य केलं आहे या नंतर सर्वत्र या विषयावर जोरदार चर्चा होतांना दिसतं आहे.७० वर्षीय मोहम्मद हसनैन आणि त्यांचा ३१ वर्षांचा मुलगा इशाक अमीर प्रथम दिल्लीहून यूएईला पोहोचले आणि नंतर अफगाणिस्तानला गेले. अफगाणिस्तानातून हे पिता-पुत्र कंदहार सीमेवरून पाकिस्तानात अवैधरित्या दाखल झाले आहेत.
https://twitter.com/TheSquind/status/1707644304293052467?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1707644304293052467%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
पाकिस्तानस्थित वृत्तवाहिनीने जिओ न्यूजशी बोलताना मोहम्मद हसनैन यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या निर्मितीसाठी आम्हाला भारतात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यामुळेच पाकिस्तानात आलो असल्याचं त्यां बापलेकांनी सांगितलं.
जेव्हा पत्रकाराने त्यांना विचारले की पाकिस्तान सरकारने त्यांना भारतात परत पाठवले तर काय होईल, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “हे मला मान्य नाही. तुम्ही मला मारू शकता किंवा मला गोळ्या घालू शकता. तुम्ही मला कोणतीही शिक्षा द्याल, ती मला मान्य आहे. हा माझ्या स्वप्नांचा देश आहे. भारतात परत जायचे नाही.
आपल्या भावी पिढ्यांना पाकिस्तानात पाहण्याचे आपले स्वप्न असल्याचे हसनैन यांनी सांगितले. त्यांनी पाकिस्तानात उदरनिर्वाहासाठी नोकरीही मागितली.हे भारतीय पिता-पुत्र दोघं पाकिस्तानात कसे पोहोचले आणि पाकिस्तान सरकारकडे कसा आश्रय मागत आहेत. पाकिस्तान सरकार यावर काय निर्णय घेतात यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.
हसनैन यांनी पाकिस्तानमध्ये मीडियाशी बोलताना दावा केला की, ते आणि त्यांच्या मुलाने 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली सोडली आणि प्रथम यूएईला पोहोचले. तेथून या पिता-पुत्राने व्हिसासाठी अफगाणिस्तान दूतावासाशी संपर्क साधला. हसनैन यांनी असाही दावा केला की, पाकिस्तानात पोहोचल्यानंतर त्यांनी एका ट्रान्सपोर्टरला शहरात पोहोचण्यासाठी मदत केल्याबद्दल 60,000 रुपये दिले.