भडगाव तालुक्यातील कर्मवीर तात्यासाहेब हरी राव जी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक जिल्हा दूध संघाचे संचालक व ग्राम स्तरावर सर्व पदे भूषवलेली एक समाजकारणी शिक्षण महर्षी व्यक्तिमत्व आदरणीय नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा आज 66 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात व दिमाखात बाळद रोड येथील संस्थेतील डीएड कॉलेज या ठिकाणी संपन्न झाला.
नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्या अगोदर नानासाहेबांनी संस्थेचे संस्थापक चेअरमन कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील तसेच संस्थेचे ज्येष्ठ संचालक स्वर्गवासी दादास युवराज हरी पाटील आण्णासो अशोक हरी पाटील ताईसो कमलाजी माई सो साधनाताई व विद्यादेवतेला पूजन करुन माल्या अर्पण केले.
यावेळेस त्यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेतील दोन शाळांना प्रत्येकी दीड लाख एवढा निधी शालेय स्तरावर भौतिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आला त्या दोन शाळांची निवड लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आली. यावर्षी तब्येत बरी नसल्याने व भावकीतील सुतक असल्याकारनाने वाढदिवस साधा पद्धतीने साजरा करण्यात आला पण तरीसुद्धा साध्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी नानासाहेबांना तब्बल तीन तास हार गुच्छ व शाल श्रीफळ स्वीकारायला लागल्या.
यावेळी भडगाव पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर आप्पा पाटील सह प्रत्येक गावातील सरपंच व मोठ्या प्रमाणावर विकास समितीचे चेअरमन यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.याप्रसंगी मंत्रालयाचे आवर सचिव दादासो प्रशांत विनायक पाटील संस्थेतील डॉक्टर पूनम ताई प्रशांत पाटील माजी नगराध्यक्ष श्याम दादा भोसले जिल्हा बँकेचे माजी संचालक नानासाहेब देशमुख साहेबांचे व्याही दादासो विनायकराव पाटील विविध गावातील स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन त्यांच्या संचालक मंडळ कर्मवीर दादासाहेब आयोजित पाटील किसान शिक्षण संस्थेतील लोकांची पतपेढी त्यांचे चेअरमन संचालक मंडळ तसेच संस्थेतील मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी उपस्थित यांचे आभार नाना साहेबांच्या वतीने डा पुनम ताई प्रशांत पाटील यांनी मानले.