जळगाव,(प्रतिनिधी)- समाज सेवेचे व्रत अंगीकारलेले आदर्श उद्योजक व समाजभूषण प्रवीणसिहं पाटील यांची राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राज्य कार्यध्यक्ष पदी दिनांक २५ रोजी जळगाव येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना संस्थापक अध्यक्ष सुप्रीमो श्री सुखदेव सिंह दादा गोगामेडी ,राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री योगेंद्र सिंह कटार,श्री आनंद सिंह जी ठोके ,जीवन सिंह जी सोलंकी ,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री कवरसिंह बेनाडे,प्रदेश उपाध्यक्ष श्री दामोदर राजपूत ,संदीप सिंह राजपूत ,जिल्हा प्रमुख श्री महेंद्रसिंह राजपूत व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना पदाधिकारी यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत व सामाजिक कार्याचा आदर्श घेत खान्देश विभागातील राजपूत टीम ने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री आनंद सिंह जी ठोके यांचे जळगाव येथील उपस्थितीत जाहीर प्रवेश केला
व आगामी काळात खान्देश मधून १०१पदाधिकारी जे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत असे समाज बांधव ,यांना नियुक्ती पत्र देवून संघटन वाढवून मजबूत करण्याचे आश्वासन श्री प्रवीण सिंह पाटील यांचे नेतृत्वात खान्देश विभाग प्रमुख श्री विलास सिंह पाटील , व खान्देश कार्याध्यक्ष श्री विठ्ठल सिंह मोरे यांनी या वेळेस नमूद केले.
नवीन नियुक्ती पुढील प्रमाणे…
श्री प्रवीणसिंह पाटील आदर्श उद्योजक व समाज भूषण प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र
सौ,वैशाली सोलंकी महिला प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र
श्री विलास सिंह पाटील खान्देश विभाग अध्यक्ष
श्री मोहनसिंगजी पवार साहेब खान्देश विभाग मार्गदर्शक
श्री विठ्ठल सिंह मोरे खान्देश विभाग कार्याध्यक्ष
श्री महेंद्रसिंह पाटील खान्देश विभाग उपाध्यक्ष
श्री संदीप सिंह राणा जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष ,श्री बापू सिंह राणा खान्देश विभाग युवा अध्यक्ष ,श्री भगवान सिंह खंडालकर जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष या प्रमाणे असून खान्देश मधील पदाधिकारी यांची लवकरच नियुक्ती करून संघटन वाढवत मजबूत करण्याचे विलाससिह पाटील यांनी जाहीर केलं.