जळगावातील ऐतिहासिक भोईटे गढीचे वारसदार आणि शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद असणाऱ्या जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज मर्यादीत अर्थात ‘मविप्र’ या संस्थेचे मानद सचिव निलेश रणजित भोईटे या तरुण तडफदार आणि उमद्या युवा नेतृत्वाचा. आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त प्रासंगिक….
त्र्यंबकराव बापूराव भोईटे (सरकार) के.. मोतीराम पाटील, के. दौलतराव पाटील, कै. रावजी पाटील आसोदेकर, कै. तुकाराम पाटील ममुराबादकर, कै. वामनराव आनंदराव देशमुख अडावदकर, यांच्यासह अन्य शिक्षणप्रेमी मंडळींनी पुढाकार घेवून सन १९१७ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी रायफील्ड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शिक्षण परिषद भरविण्यात आली. त्यातूनच आज शतकोत्तरी वाटचाल करणाऱ्या संस्थेचा जन्म झाला. सध्या निलेश भोईटे आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली या संस्थेचा वटवृक्ष झाला. आज संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.
खरंतर निलेश भोईटे हे जळगावचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सरकार, सांस्कृतिक जीवनाशी समरस झालेल्या भोईटे गढीचे आणि घराण्याचे युवा वारसदार. १९८५ पासून नगरसेवक आणि नंतर विविध समित्यांचे सभापतीपद यशस्वीपणे भूषविलेल्या कै. रणजित भोईटे आणि१९९७ साली नगराध्यक्षपद सांभाळणाऱ्या श्रीमती लताताई भोईटे यांचे पुत्र. तसेच मोठे काका प्रतापराव भोईटे, माजी रिझर्व्ह बँक ऑफीसर, मविप्रचे माजी मानद सचिव अॅड. तानाजीराव भोईटे, काका शिवाजीराव भोईटे माजी अभियंता पाटबंधारे विभाग, निलेश भोईटे हे परिवाराचा वसा आणि वारसा अतिशय कणखरपणे पुढे चालवित आहेत. सन १९७९ च्या २६ सप्टेंबरला जन्मलेल्या निलेश भोईटे यांनी संगणक शास्त्रात पदविका संपादन केली आहे. अहमदनगर आणि पुणे येथे त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना बुद्धिबळ आणि क्रिकेट या खेळीची मनस्वी आवड असून त्यात यांनी प्राविण्यही मिळविले आहे. शिवाय मराठा प्रिमियर लिगचे तसेच अन्य क्रिडा स्पर्धांचे प्रायोजकत्वही स्विकारले आहे.
निलेश भोईटेंचा ‘लोकमत’कडून सातासमुद्रापार गौरव! |
त्यांची ऑक्युलन्स टेक्नॉलॉजिस अॅन्ड मल्टीट्रेड प्रा. लि. नावाची ई-कॉमर्स संस्था असून सन २००१ पासुन पुणे आणि जळगाव या ठिकाणी कॉम्प्युटर इन्स्टिट्युट आहेत. त्यांच्या या संघर्षमय जीवन प्रवासात त्यांच्या सहचारीणी सौ. मानसी यांची खंबीर साथ लाभत आहे. त्या उच्च शिक्षित आणि कलासक्त आहेत. या दोघांच्या संसार वेलीवर कु. नूपूर आणि कु. मंदिरा या सुकन्यारूपी फुले उमलली आहेत. ध्येय जितके महान, तेव्हा त्याचा मार्गही खडतर असतो हे लक्षात घेऊन मार्गक्रमण करणाच्या निलेश भोईटे यांना लोकमत इंटरनॅशनल अवॉर्ड मधील यंग अचिव्हर्स एज्युकेशन इन खान्देश हा अवॉर्ड देऊन दुबई येथे गौरविण्यात आले.