जळगाव,(प्रतिनिधी)- राजपूत समाजाच्या विविध संघटनाचे पदाधिकारी यांनी एकत्र येतं समाजाच्या मागण्यांसाठी आज पद्मालय विश्राम गृह जळगांव येथे दि,2/10/2023 रोजी बैठक घेऊन राजपूत समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सविस्तर असे की, श्री.छत्रपती संभाजी नगर तेथे राजपूत समाजाच्या महामेळाव्यात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने राजपूत समाजाच्या मागण्या मंजूर केल्या होत्या दरम्यान त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही म्हणून जळगाव (खान्देश) येथे उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे.राज्य शासनाने आमच्या मागण्याबाबत गंभीरपणे चर्चा विनिमय करून निर्णय घ्यावा व आमच्या रास्त मागण्या मान्य करून त्याची तात्काळ अंमलबजावणी कारण्यात यावी असा एकमताने बैठकीत निर्णय घेण्यात आला असून मागण्या मान्य न झाल्यास प्रसंगी राजपूत समाजातील विविध संघटन चे पदाधिकारी एका छता खाली येवूनउपोषण करण्यात येईल चर्चा करण्यात आली.
उपोषनाचे पडसाद राज्यभर उमटतील
या वेळेस राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्या शासनाने मंजूर कराव्या अन्य था उपोषणाचे हत्यार तयार असून सुरुवात जळगाव खान्देश येथील पवित्र भूमीतून होईल याचे पडसाद राज्यभर उमटतील व समाज पेटून उठेल अशा संतप्त भावना सदर बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.2 ऑक्टोबर रोजी होवू घातलेल्या उपोषणास राज्यभरातून पाठिंबा येत असून खान्देश राजपूत समाज यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व पदाधिकारी यांनी केले.
यांची होती उपस्थिती
सदर प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री आनंदसिंहजी ठोके मालेगाव ,श्री देवचंद सिंहजी बारवाल,विनोद सिंहजी पवार संभाजी नगर ,श्री गिरीश भाऊ परदेशी ,जळगांव येथील ॲड,देवेंद्र सिंह जाधव, साहेब श्री प्रवीणसिंहजी पाटील ,विलाससिंह पाटील ,महेंद्र सिंहजी पाटील, श्री विनोदसिंह राऊळ किशोर जी महाराज श्री महेंद्रसिंग राजपूत गणेशसिंग देशमुख उत्तमसिंग महाले रणसिंग राजपूत श्री किशोर दादा गांगुर्डे श्री विठ्ठल सिंह मोरे, सौ वैशालीताई सोलंकी ,दामोधर सिंह राजपूत भुसावळ , किरण दादा राजपूत रोशनसिंग राणा प्रा. सुरेशसिंह राजपूत सर व राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.