पुणे,(प्रतिनिधी)- सर्वत्र गणेश उत्सव साजरा होतं असतांना एका गणेश भक्ताने आपल्या घरात डेकोरेशन करण्यासाठी करण्यात आलेल्या लाइटिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे घरात आग लागून तरुण झोपेत असतांनाचं आगीत होरपडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.गणेश उत्सावादरम्यान सार्वजनिक उत्सव सोबतचं गणेशभक्त आपल्याला परीने घरी सुद्धा गणपती उत्सव साजरा करत डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करत असतात त्यातच पुणे येथील खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेने संपूर्ण खेड तालुका हादरला आहे. ऐन गणेशोत्सवात हा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.
सविस्तर असे की,पुणे येथील खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथील वैभव जगन्नाथ गरुड (वय ३५) यांनी आपल्या घरी गणेश उत्सव साजरा करण्यासाठी लावलेल्या लाइटिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने घरात आग लागली त्यात या तरुणाचा जळून मृत्यू झाला. याबाबत खेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील खरापुडी बुद्रुक येथील दत्तनगर येथे वैभव गरुड हे त्यांच्या कुटुंबासमवेत राहतात. गरुड यांनी त्यांच्या घरातील गणपती बाप्पा समोर आकर्षक सजावट करत लाईटच्या माळा लावल्या होत्या. मात्र मध्यरात्री घरात शॉर्ट सर्किट झाले आणि घरात आग लागली. त्यामुळे घरातील सर्व साहित्य त्यात साड्या, बेड आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. मात्र या आगीत गादीवर झोपलेले वैभव यांचा जागेवरच जळून मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
वैभव गरड हा परिसरात सर्पमित्र म्हणून परिचित होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवाल आहेत. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने पत्नीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. या घटनेने परिसरात अनेकजणांना धक्का बसला आहे. वैभव याचा अचानक झालेल्या दु्र्देवी मृत्यूने त्याच्या मित्र परिवारावर