पाचोरा – तालुका शिक्षण प्रसारक सहकारी संस्था पाचोरा संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे आज 17 सोमवार रोजी या शैक्षणिक वर्षाचा प्रथम दिवस विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव दिवस म्हणून साजरा करण्यात आला .
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजयजी वाघ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश , पाठ्यपुस्तके, गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले . याप्रसंगी विकास पाटील गटशिक्षणाधिकारी पाचोरा . संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी , शालेय समितीचे चेअरमन दादासाहेब खलील देशमुख , तांत्रिक विभाग चेअरमन अण्णासाहेब वासुदेव महाजन , ज्येष्ठ संचालक , सेवानिवृत्त शिक्षक शांताराम चौधरी सर ,ए जे महाजन सर व शाळेचे मुख्याध्यापक एस डी पाटील , पर्यवेक्षिका पी पी पाटील , सी एस धुळेकर , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रमिला वाघ , पर्यवेक्षकभास्कर बोरुडेे ,एन आर ठाकरे एस पी करंदेे, व्ही एस साळुंके सर उपस्थित होते संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी पालकांशी संवाद साधला, पालकांच्या अडचणी समजून घेतल्या, आणि आपण आपल्या पाल्यास अतिशय दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थेतील गो से हायस्कूल पाचोरा येथे प्रवेश घेतला . यापुढे आपल्या पाल्याची कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी , शालेय समितीचे चेअरमन , मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांच्यामार्फत आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. याप्रसंगी बहुसंख्य पालक उपस्थित होते ,प्रवेश दिन मोठ्या दिमाखात , ढोल-ताशांच्या गजरात , लेझीमच्या तालात ,पताका लावून , रांगोळ्या काढून शालेय पोषण आहारात शिरा रवा पोहे देऊन साजरा करण्यात आला . प्रसन्न वातावरण तयार करून विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आनंददायी कसा होईल याकडे लक्ष देण्यात आले. सर्व पालक ,विद्यार्थी वातावरण पाहून खुश झाले .श्री आर बी बोरसे सरांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली .