लीबियात आलेल्या भीषण पुरामुळे २० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून दरम्यान, या घटनांची चौकशी करण्यात यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. लीबियाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आपत्ती असून यावेळी पुराच्या पाण्यात मृतदेह तरंगतांना दिसले तर अनेकांचे मृतदेहही सापडत नसल्याने मोठा संकट लिबियावर ओढवलं आहे.